आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AB, Chris And I Will Be Able To Do Better In IPL 8, Says RCB's Virat Kohli

वारे आयपीएलचे : यंदा 'कप' आमचाच - विराट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएलच्या आठ संघांतील बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा संघ ख्रिस गेल, एल्बी डिव्हिलर्स यांच्यासारख्या दिग्गजांनी सजलेला आहे. तरीही या संघाला गेल्या ७ वर्षांपैकी एकही स्पर्धा जिंकता आली नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली याला मुंबईत हाच प्रश्न विचारल्यानंतर त्याची प्रतिक्रिया होती, ‘आम्ही आयपीएलच्या दोन सेमी आणि एक फायनल खेळलो. चॅम्पियन्स लीग फायनल खेळलो. टायटलच्या अगदी जवळ आलो होतो. विजेतेपदाची क्षमता असलेली ‘टीम’ आमच्याकडे या वेळी आहे.’

यंदाचा हंगाम आमच्यासाठी वेगळा असेल. गेल्या ३-४ वर्षांत मी, ख्रिस व डिव्हिलर्स आम्ही खूपच दडपणाखाली होतो. कारण फलंदाजी आमच्यावरच अवलंबून होती. अन्य संघांकडे पाहा, त्याच्या तळाचे फलंदाजही धावा काढीत होते, त्यामुळे अन्य फलंदाजांना दडपणाशिवाय खेळता आले. विराट उत्साहाने पुढे म्हणाला, ‘या वेळी परिस्थिती वेगळी आहे. या वेळी दिनेश कार्तिक, सॅमी, मनदीप, बद्रीनाथ आमच्याकडे आहेत. त्यामुळे फलंदाजीची सखोलता आमच्याकडे आहे. भारतीय खेळाडूंचे मिश्रणदेखील या वेळी चांगले आहे. जगातील सर्वोत्तम ‘हिटर्स’ आमच्याकडे आहेत, तर सर्वोत्तम गोलंदाजही आमच्या चमूत आहेत.'

एल्बी डिव्हिलर्सवरील दडपण आता विश्वचषक संपल्यामुळे निश्चितच गेले असणार. या वेळी तो पहिल्या चेंडूपासून निश्चितपणे फलंदाजी करू शकतो, आक्रमक रूप धारण करू शकतो. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात भेदक गोलंदाज ‘स्टार्क’ याच्या दुखापतीविषयी व दिल्ली संघात कधी येणार याबाबत विचारले असता विराट म्हणाला, ‘दोन आठवड्यांची विनंती त्याला सक्तीची आहे. त्यामुळे ३-४ सामन्यांनंतर तो संघात येईल. स्पर्धेच्या मध्यावर दुखापतग्रस्त होऊन त्याची सेवा आम्हाला गमवायची नाही. स्पर्धा निर्णायक टप्प्यावर आली असता सध्याचा त्याचा गोलंदाजीचा फॉर्म पाहता, तो एकहाती सामने आमच्या बाजूने फिरवू शकतो. तो संघात परतल्यानंतर आमची ताकद वाढणार, हे निश्चित.'

सर्वजण ताजेतवाने
चार महिने सलग क्रिकेट खेळून थकवा आला नाही का? यावर विराट म्हणाला, ‘शारीरिक दमछाक होतेच, परंतु व्यावसायिक क्रिकेटपटूंना त्यातून सावरणे सध्या चांगलेच जमले आहे. ८-१० दिवसांच्या विश्रांतीने सर्वजण ताजेतवाने होतात. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धाही रोमहर्षक, चुरशीची व उत्कंठावर्धक होईल यात शंका नाही. सर्व खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळाली आहे. हे सामन्यांत दिसेलच.’