जोहान्सबर्ग - साऊथ आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटवटू एबी डिव्हिलियर्सने तुफानी खेळी करत वन डे सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे केला आहे. वेस्ट इंडिजच्या विरोधात रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात डिव्हिलियर्सने केवळ 31 चेंडूत शतक ठोकले. त्याने 44 चेंडूत 149 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि तब्बल 16 षटकारांचा समावेश होता.
या विक्रमाबरोबरच डिव्हिलियर्सने 36 चेंडूमध्ये कोरी अँडरसनने केलेल्या सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला आहे. न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनने 1 जानेवारी 2014 मध्ये हा विक्रम केला आहे. त्यात 14 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. त्याआधी सर्वात वेगवान शतकाचा विक्रम पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदी याच्या नावावर होता. त्याने 37 चेंडूत शतक केले होते.
वेस्ट इंडिजच्या विरोधात खेळी
कर्णधार एबी डिव्हिलियर्सने मैदानावर उतरताच फटकेबाजी करायला सुरुवात केली होती. प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा हे ठरवूनच जणू तो, मैदानात उतरलेला असेल. कारण 44 चेंडूंमध्ये 338.63 च्या स्ट्राइक रेटने त्याने 149 धावा कुटल्या. दुस-या बाजुला हाशीम आमलानेही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. त्याने 142 चेंडूंचा सामना करत 14 चौकारांच्या मदतीने 153 धावांची खेळी केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, एबी डिव्हिलियर्सच्या खेळीचे PHOTO