Home | Sports | From The Field | abdul razzaq play in county cricket

लिसेस्टरशायरचा अब्दुल रज्जाकशी करार

agency | Update - Jun 02, 2011, 10:45 AM IST

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकशी इंग्लंडचा कौंटी संघ लिसेस्टरशायर संघाने आगामी सत्रासाठी करार केला आहे.

  • abdul razzaq play in county cricket

    abdulrazzaq_258लंडन - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकशी इंग्लंडचा कौंटी संघ लिसेस्टरशायर संघाने आगामी सत्रासाठी करार केला आहे. आगामी एफएल टी-२0 स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन क्लबने हा करार केला आहे.

    रज्जाक ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ऍण्ड्र्यू मॅकडोनाल्डसोबत खेळणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या जागी रज्जाकची निवड करण्यात आली आहे. ३१ वर्षीय रज्जाकने ४६ कसोटी, २६२ वन-डे आणि २६ टी-२0 सामने खेळले आहेत. यापूर्वी रज्जाकला हॅम्पशायर, सरे, वॉरविकशायर, मिडिलसेक्सकडून खेळण्याचा अनुभव आहे.Trending