आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abdul Razzaq, Rehman Opportunities In T 20 Cricket

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अब्दुल रझ्झाक, रहमानला टी-20 क्रिकेटमध्‍ये संधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- मार्चमध्ये होत असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी फिरकीपटू अब्दुल रझ्झाक आणि युवा फलंदाज सब्बीर रहमानला संधी मिळाली आहे. या स्पर्धेसाठी नुकताच 15 सदस्यीय यजमान बांगलादेश संघ जाहीर करण्यात आला. या वेळी या दोघांची यजमान संघात निवड करण्यात आली. येत्या 16 मार्चपासून वर्ल्डकपला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत मुश्फिकर रहीमच्या नेतृत्वाखाली यजमान बांगलादेश संघ सहभागी होणार आहे. रझ्झाकने आतापर्यंत करिअरमध्ये 28 टी-20 सामन्यात एकूण 39 विकेट घेतल्या आहेत. या 31 वर्षीय खेळाडूला दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेत सहभागी होता आले नाही. टीममध्ये तमीम इक्बालसह अनामुल हक, मोमिनुल हकची वर्णी लागली.