दोहा - कतार मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर व माजी वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन अभिजित गुप्ताने फ्रान्सच्या फॅबियन लिबिसज्सकीला पराभूत केले. या विजयानंतर त्याने संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चीनच्या झू जून ड्रॉ केल्यानंतर अभिजित गुप्ताने आक्रमक खेळ करताना लिबिसज्सकीला हरवले. या विजयानंतर गुप्ताच्या नावे २.५ गुण झाले आहेत. स्पर्धेत हॉलंडचा अव्वल मानांकित अनीश गिरीने सर्बियाच्या इवान इवेनेसिवकला पराभूत केले.