आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजित गुप्ताची दुबई ओपनमध्ये यशस्वी भरारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - भारताचा अव्वल बुद्धिबळपटू अभिजित गुप्ताने सुदानच्या ओस्मान अब्देल्गादीरला मात देत 16 व्या दुबई आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत यशस्वी भरारी घेतली आहे. भारताचा ग्रँडमास्टर एम.आर.ललिथ बाबूने पार्टेकविरुद्धचा सामना अनिर्णीत अवस्थेत सोडला. 50 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षिसाची रक्कम असलेली ही स्पर्धा एकूण नऊ फेरीत खेळवली जाणार आहे.
स्पर्धेत अभिजितने या लौकिकास साजेशी कामगिरी करत अब्देल्गादीरला पराभूत केले. त्याने अब्देल्गादीरला वरचढ होण्याची एकही संधी दिली नाही. गुप्ताने मिळालेल्या आघाडीचा शेवटपर्यंत फायदा उचलला. दुसरीकडे ललिथ बाबूने पार्टेकविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यापूर्वी तब्बल 87 चाली खेळल्या. दरम्यान, दोघांनीही तुल्यबळ लढत दिली. निकाल शेवटपर्यंत लागण्याची शक्यता नसल्याचे पाहून दोघांनी सामना बरोबरीत सोडण्याचा निर्णय घेतला. अन्य भारतीय खेळाडूंमध्ये सिवा महादेवनने रशियाचा ग्रँडमास्टर सेर्गेव्ह व्होल्कोव्हसोबतची लढत अनिर्णीत ठेवली.