आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजित गुप्ता विजयी; सागरची लढत ड्रॉ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अल्बेना- भारताचा ग्रॅँडमास्टर अभिजित गुप्ताने सोमवारी युरोप अल्बेना बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत विजय मिळवला. त्याने बल्गेरियाच्या मेतोडी स्टोइनेवला धूळ चारली. त्याचा हा स्पर्धेतील पहिला विजय ठरला. यापूर्वी, पहिल्या फेरीत त्याचा सामना ड्रॉ झाला होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मास्टर्स नॉर्म मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या सागर शाहने स्पर्धेत चांगली सुरुवात केली. त्याने उक्रेनच्या युरी सोलाडोव्निशेंकोला बरोबरीत रोखले. तसेच विष्णू प्रसन्नाने इंडोनेशियाच्या इरिन करिश्मा सुकंदरला पराभूत केले. हीच विजयाची लय अश्विन जयरामनेही कायम ठेवली. त्याने बल्गेरियाच्या मारियो वुटोवचा पराभव केला.

भारताच्या अनुराग महामलने तुर्कीच्या यिल्दिज कावुसोग्लुवर मात केली. स्वप्निल धोपाडेने दिमितार मारहोलेववर विजय मिळवला. तसेच एन.राघवीने नॉर्वेच्या ओल्गा डीचा पराभव केला. स्पर्धेतील सात फेरीचे सामने अद्याप शिल्लक आहेत. भारताच्या अभिजित गुप्ता व सागर शाहने 1.5 गुणांची कमाई केली. या दोघांनी शानदार कामगिरीसह स्पर्धेत आगेकूच केली आहे. तसेच अश्विन व प्रसन्नादेखील जबरदस्त फॉर्मात आहेत.