आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयशातून घेतला धडा अन् रचला इतिहास, आता रूपेरी पडद्यावर दिसणार संघर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रीडा विश्‍वात गेल्‍या काही दिवसांपासून जबरदस्‍त बदल होताना दिसताहेत. क्रिकेटवेडया देशात आता इतर खेळांनाही चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्‍ये नाव कमावण्‍यासाठी नवी पिढीही आतूर झाली आहे.

ज्‍या खेळाडूंनी आपल्‍या मेहनतीने आणि कौशल्‍याने ऑलिम्पिकमध्‍ये तिरंगा फडकवला त्‍यांना याचे सर्व श्रेय जाते. दुस-या खेळांमध्‍येही भारतीय तरबेज असल्‍याचे या खेळाडूंनी दाखवून दिले.

त्‍यापैकीच एक खेळाडू आहे, अभिनव बिंद्रा. ऑलिम्पिकमध्‍ये वैयक्तिक स्‍पर्धेत गोल्‍ड मेडल मिळवून देणारा बिंद्रा पहिलाच खेळाडू ठरला. 2008 सालच्‍या बिजिंग ऑलिम्पिकमध्‍ये बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्‍पर्धेत ही ऐतिहासिक कामगिरी करून देशाचा गौरव वाढवला होता. भारतातील या टॉप शूटरचा 28 सप्‍टेंबर रोजी वाढदिवस होता. त्‍याच्‍या वाढदिवसानिमित्त जाणून घ्‍या एका अपयशापासून धडा घेऊन बिंद्राने चीनमध्‍ये कसा रचला इतिहास...