आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhinav Bindra Claims 3rd Gold At Inter Shoot Tri Series

अभिनव बिंद्राची आंतरनेमबाजी तिरंगी मालिकेत गोल्डन हॅट्ट्रिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारताचा स्टार नेमबाज अभिनव बिंद्राने हेग (हॉलंड) येथे ‘गोल्डन’ हॅट्ट्रिक नोंदवली. त्याने आंतरनेमबाजी तिरंगी मालिकेत सलग तिसरे सुवर्ण आपल्या नावे केले. या स्पर्धेत तीन सुवर्ण जिंकणारा अभिनव हा पहिला भारतीय नेमबाज ठरला. त्याने एअर पिस्टलमध्ये आपले तिसरे सुवर्ण निश्चित केले.
अभिनवने ऑलिम्पिक चॅम्पियन एलिन जॉर्ज मोलदोवीनुला पिछाडीवर टाकून प्रथम क्रमांक पटकावला. त्याने दोन्ही अंतिम फेरीत 209 आणि 209.3 गुणांची कमाई केली. त्याने अनुक्रमे 3.3 आणि 2.4 गुणांनी जॉर्जला मागे टाकून सुवर्ण पटकावले.