आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abhinav Bindra Ends His Professional Shooting Career With Two Bronze Medals, News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशियाई स्‍पर्धेत 2 कास्‍यपदक जिंकणा-या अभिनव बिंद्राला 'लगीनघाई', शुटिंगला करणार अलविदा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अभिनव बिंद्रा)
दक्षिण कोरिआमध्‍ये सुरु असलेल्‍या आशियाई खेळामध्‍ये भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने दोन कास्‍यपदकावर आपले नाव कोरले. तसेच मंगळवारी व्‍यावस‍ायिक नेमबाजीमधून निवृत्‍तीची घोषणा केली.
दोन कास्‍यपदकाची कमाई
अभिनव बिंद्राने आशियाई स्‍पर्धांमध्‍ये 10 मीटर एअर रायफलमध्‍ये रवी कुमार आणि संजीव राजपूत यांच्‍या साथीने सांघिक कास्‍य पदक पटकावले. तसेच पुरुष एकेरीमध्‍ये कास्‍यपदाकवर ठसा उमटविला.
आता करणार लग्‍न
अभिनव बिंद्रा यापूवी विज्ञानाचा शिक्षक राहिला आहे. दोन दशकांपासून त्‍याचे मानसोपचार तज्‍ज्ञ राहिलेले डॉक्‍टर अमित भट्टाचार्य यांनी सांगितले की, 'रियो डी जेनेरियोमध्‍ये होणा-या ऑलिम्पिकमध्‍ये सहभागी होण्‍याचा विचार अभिनव करत होता. खुप विचार केल्‍यानंतर त्‍याने हा निर्णय घेतला आहे'.
चंदीगडच्‍या पीजीआय रिसर्च ऑफिसर अमित यांनी सांगितले की, ' ब्रिंद्राने आता लवकर लग्‍न करुन फॅमिली प्‍लॅनिंग करावे, अशी बिंद्रा परिवाराची इच्‍छा आहे'.