आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Abhinav Bindra News In Marathi, Divya Marathi, Shooting

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्यापासून मी बनणार हौशी नेमबाज : बिंद्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - एशियाडमध्ये दोन कांस्यपदके पटकावणारा भारतीय नेमबाज तसेच नेमबाजीतले एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकावणारा भारतीय अभिनव बिंद्रा याने उद्यापासून मी केवळ एक हौशी नेमबाज राहणार असल्याचे जाहीर केले. एशियाडमध्ये १० मीटर एअर रायफलच्या सांघिक गटात भारतीय पथकाचे नेतृत्व करत अभिनवने भारताला कांस्यपदक पटकावून दिले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बिंद्रा याने मी काल केलेले ट्विट अत्यंत सरळ असल्याचे सांगितले. मी यापुढे केवळ हौशी नेमबाज म्हणून आठवड्यातून दोनदाच सराव करणार आहे. तसेच हा काही अचानक घेतलेला नरि्णय नसून मी खूप विचाराअंती या निर्णयावर पोहोचलो आहे.
खरे तर नियमित सराव करण्यावरून केवळ कधीतरी सराव करणे असा दिनक्रम मलादेखील जड वाटत आहे. मात्र, रिओ ऑलिम्पिकबाबत काय? या प्रश्नावर बोलताना मी त्याबाबत आता अधिक काही बोलू इच्छित नसल्याचे म्हटले आहे. मी सध्या ज्या स्तरापर्यंत गुण मिळवत आहे, तेवढेच मिळणे शक्य असेल, तरच शूटिंग वर्ल्ड कपमध्येदेखील सहभागी होणार असल्याचे अभिनवने नमूद केले. ६ ऑक्टोबरला आमच्या फाउंडेशनच्या वतीने मी बंगळुरूला नेमबाजांना शिष्यवृत्ती देण्यासाठी जात असल्याचेही त्याने सांगितले.