आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan Dons A New Role, Buys Kabbadi League Outfit

प्रो कबड्डी लीगमध्ये अभिषेक बच्च्नचा संघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कबड्डी हा भारताचा खेळ आहे. भारताच्या या खेळाचे ‘पेटंट’ आपल्याकडे असल्याचा अन्य कुणी देशाने दावा करण्याआधी आपण काहीतरी करायला हवे, या भावनेने मी येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात होणार्‍या ‘प्रो कबड्डी’ लीगमधील राजस्थान संघ विकत घेतला, अशी माहिती सिनेअभिनेता अभिषेक बच्चन याने आज मुंबईत पत्रकारांना दिली.

अभिषेक पुढे म्हणाला, ‘मला माझ्या वडिलांनी, अमिताभ बच्चन यांनी कबड्डी हा खेळ लहानपणी शिकवला होता. आमच्या घराच्या आवारात मोठी जागा होती. मी व माझे चुलत भाऊ तेथे कबड्डी खेळायचो. दिल्लीत शाळेत असताना तिसर्‍या इयत्तेपर्यंत वर्गाच्या संघातूनही मी कबड्डी खेळायचो.’ वडिलांच्या ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटातील कबड्डी खेळतानाची, गाणे म्हणतानाची भूमिकाही पाहायचो. वडील तेव्हा खेळताना दम म्हणून ‘तेरा मुछ लाललाल’ असे म्हणायचे याचीही आठवण अभिषेकने सांगितली.

क्रिकेट, हॉकी हा मूळ इंग्रजांचा खेळ आहे, परंतु कबड्डी हा आपला खेळ आहे. तेव्हा या खेळाला ऊजिर्तावस्था आणण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी सिनेअभिनेता म्हणून राजस्थानचा संघ घेतला नाही तर कबड्डी या खेळाच्या प्रेमापोटी, आपुलकीपायी संघ मालक बनलो, असेही अभिषेक यांनी या वेळी स्पष्ट केले.

लीगसाठी भारतीय कबड्डी महासंघांशी 10 वर्षांचा करार केला आहे. मुंबई, पुणे, जयपूर, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद हे 8 संघ खेळणार आहेत. प्रत्येक संघ स्वगृही 7 व प्रतिस्पध्र्यांकडे 7 असे 14 साखळी सामने खेळेल.

आठ संघ सहभागी
आठ संघांमध्ये ही स्पर्धा होईल. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशप्रमाणे अन्य राज्यांतील शहरांनी दर्जेदार इनडोअर स्टेडियम उपलब्ध केल्यास त्या त्या शहरांच्या फ्रँचायझीलाही तत्काळ मान्यता देण्यात येईल.

तीन प्रकारे खेळतात
कबड्डी हा खेळ जगात तीन प्रकारे खेळला जातो. एक गोल्ड कबड्डी जेथे कुस्तीचाच काहीसा प्रकार असतो. दुसरा बीच कबड्डी आणि तिसरा भारतात व जगात नियमानुसार खेळला जाणारा कबड्डी हा खेळ. त्या खेळाच्या नियमानुसार ही लीग होईल, अशी माहिती आयोजक चारू शर्मा यांनी या वेळी दिली.