आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ACC Emerging Teams Cup: Afghanistan Beat India U 23

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगाणिस्‍तानकडून पराभवानंतरही भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर- सिंगापूर येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या एशियन क्रिकेट कौन्सिल इमर्जिंग चषक स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानकडून धक्कादायक पराभव झाला. मात्र, या पराभवानंतरही भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 184 धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला 9 बाद 156 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून सलामीवीर के. राहुल (51) आणि अंकित बावणे (39) चा संघर्ष व्यर्थ ठरला.

विजयासाठी 185 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर उन्मुक्त चंद (10), बाबा अपराजित (2), अशोक मनेरिया (5) हे फलंदाज स्वस्तात बाद झाले. राहुल आणि अंकित वगळता भारतीय संघाच्या इतर फलंदाजांना अफगाणच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना करता आला नाही.

तरीही उपांत्य फेरीत
दोन सामने जिंकल्यामुळे भारतीय युवा संघाने अ गटात अव्वल स्थान पटकावत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत भारत (+0.440), पाकिस्तान (+0.425), अफगाणिस्तान (+0.177) या तिन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण होते. मात्र, सरस रनरेटच्या आधारे भारताने गटात अव्वल स्थान पटकावले.