आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा, दिल्ली न्यायालयाने स्थगिती उठवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ललित मोदी यांच्याविरुद्ध निर्णय घेण्यासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सर्वसाधारण सभेला स्थगिती देणारा निर्णय आज दिल्ली उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला. चार दिवसांपूर्वी ललित मोदी यांनी या सभेचे आयोजन करण्याची सूचना देण्याचा अधिकार हंगामी सचिव संजय पटेल यांना नाही, असे कारण देत न्यायालयाकडून 25 सप्टेंबरच्या सभेला स्थगिती आणली होती. बीसीसीआयने त्या निर्णयाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाच्या निर्णयामुळे 25 सप्टेंबरची सभा पूर्वी ठरल्याप्रमाणे होईल.