आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Action Will Take On Kundra In Today BCCI Meeting

बीसीसीआयच्या बैठकीत आज कुंद्रांवर होणार कारवाई?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक सोमवारी होत असून यात सट्टेबाजीत नाव आलेले राजस्थान रॉयल्स संघाचे मालक राज कुंद्रांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात झालेल्या हवाला व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे. दिल्ली पोलिसांनी यासंबंधीचे पत्र ईडीला पाठवले होते. फिक्सिंगमध्ये डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांची नावे आल्यानंतर पोलिसांनी हे पत्र पाठवले होते. पत्रात दाऊद व शकीलसह अटकेत असलेल्या सर्व 27 आरोपींची माहिती देण्यात आली आहे.