आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Vindoo Dara Singh, CSK Team Principal Gurunath Meiyappan And Six Others Granted Bail By Mumbai Court.

स्‍पॉट फि‍क्सिंग: मयप्‍पन, विंदू दारासिंगला जामीन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्‍यक्ष एन. श्रीनिवासन यांचे जावई गुरूनाथ मयप्‍पन आणि अभिनेता विंदू दारासिंग, प्रेम तरनेजा, अल्‍पेश पटेल सहित इतर आठ आरोपींना सट्टेबाजी प्रकरणी कोर्टाने जामीन दिला आहे.

मंगळवारी या दोघांना मुंबईच्‍या किल्‍ला कोर्टने सशर्त जामीन दिला. या सर्वांना 25-25 हजारांच्‍या जात मुचलक्‍यावर सोडण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे. जामीनानंतर सर्व आरोपींना देश सोडून जाण्‍यास मनाई करण्‍यात आला आहे. प्रत्‍येक दोन दिवसाआड या दोघांना गुन्‍हे शाखेत हजेरी लावायची आहे.

गेल्‍या महिन्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या मयप्‍पन आणि विंदूची मुंबई पोलिस आयपीएलमधील सट्टेबाजीबाबत चौकशी करीत होते. कोर्टाने सोमवारी मयप्‍पन आणि विंदूला न्‍यायालयीन कोठडी सुनावली होती.