आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Sanjjanaa Likely To Be Quizzed By The Mumbai Police

श्रीसंतबरोबरच्‍या मैत्रीमुळे चर्चेत असलेली दाक्षिणात्‍य अभिनेत्री आली अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेल्‍या श्रीसंतच्‍या रिअल लाईफचे रोज नवनवे किस्‍से समोर येत आहेत. आतापर्यंत झालेल्‍या चौकशीत राजस्‍थान रॉयल्‍सच्‍या या खेळाडूचे नाव जरी 'श्रीसंत' असले तरी तो बिल्‍कुल सात्विक नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. दारू आणि पैसे उडवायचा नाद असलेल्‍या श्रीसंतचे अनेक मुलींशी संबंध असल्‍याचे उजेडात आले आहे. यामधील तर काही दाक्षिणात्‍य अभिनेत्रीही आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, श्रीसंतच्‍या अत्‍यंत निकटची असलेल्‍या दाक्षिणात्‍य अभिनेत्रीची स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणी चौकशी होऊ शकते. गोवा येथील एका पार्टीत श्रीसंत आणि या अभिनेत्रीचे सार्वजनिकरित्‍या केलेले 'लीप-लॉक' प्रकरण चांगलेच गाजले होते.

अडचणीत आलेली ही दाक्षिणात्‍य अभिनेत्री कोण आहे ? श्रीसंतबरोबरच्‍या नात्‍यासंबंधी तिचे काय म्‍हणणे आहे, हे जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...