आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहलीची जाहिरात क्षेत्रातही \'विराट\' खेळी, सचिन-धोनीलाही करणार ओव्‍हरटेक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली/ मुंबई- काही महिन्‍यांपूर्वी पराभवाच्‍या गर्तेत सापडलेल्‍या टीम इंडियाला ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध सूर सापडला. टीमने ऑस्‍ट्रेलियाविरूद्ध सलग तीन कसोटी जिंकून इतिहास निर्माण केला. यामध्‍ये युवा क्रिकेटपटूंचा वाटा मोठा आहे. चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्‍याबरोबर आता दिल्‍लीच्‍या शिखर धवनचाही या क्‍लबमध्‍ये समावेश झाला आहे. जाहिरात क्षेत्राची नजर आता या नव्‍या स्‍टारवर टिकून आहे.

या क्रिकेटपटूंशी करार करणे फायदेशीर ठरेल असे, तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे. टीम इंडियांच्‍या काही वरिष्‍ठ क्रिकेटपटूंनी निवृत्ती घेतली आहे, तर काहीजण त्‍या मार्गावर आहेत. त्‍यातच युवा क्रिकेटपटूंबाबत सर्वसामान्‍यांबा‍बत उत्‍सुकताही वाढल्‍याचे हे तज्‍ज्ञ मानतात.

कोहलीने एका वर्षांत कमावले 100 कोटींपेक्षा जास्‍त

आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये सातत्‍याने चांगली कामगिरी करणा-या विराट कोहलीची ब्रँड व्‍हॅल्‍यूही वाढत आहे. त्‍याने गेल्‍या एका वर्षांत 100 कोटींपेक्षा जास्‍त कमाई केली आहे. सचिन आणि धोनीनंतर तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे, ज्‍याने जाहिरातीत 100 कोटींचा आकडा पार केला. विराट एका उत्‍पादनाचा ब्रँड अ‍ॅम्‍बेसेडेर बनला तर त्‍या ब्रँडपासून त्‍याला तीन कोटी रूपयांपेक्षा जास्‍त उत्‍पन्‍न मिळते.

गोदरेज, नेस्‍ले इंडिया, फेअर अँड लव्‍हली, टीव्‍हीएस मोटर्स यासारख्‍या अनेक उत्‍पादनांचा तो ब्रँड अ‍ॅम्‍बेसेडेर आहे.

पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून जाणून घ्‍या जाहिरात क्षेत्रात धूम असलेल्‍या युवा क्रिकेटपटूंविषयी...