आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Adelaide Airport Turns Dormitory For India Pakistan Fans

भारत-पाक सामन्यासाठी विमानतळ लॉनवर चाहत्यांचा मुक्काम, अॅडिलेडमध्ये सर्व हॉटेल बुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅडिलेड - क्रिकेट विश्वचषक सुरु झाला आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान अॅडिलेड येथील ओव्हल मैदानावर उद्या (रविवार) आमने-सामने येणार आहे. या सामन्याबद्दल दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. हा सामना पाहाण्यासाठी जगभरातून लोक आले आहेत. त्यामुळे येथील सर्व हॉटेल बुक झाल्या. लोकांना राहाण्यासाठी एक रुम मिळणेही दुरापास्त झाले आहे. विमानतळाबाहेरच अनेकांनी बस्तान मांडले आहे तर, चाहत्यांची गर्दी ओसरण्याचे नाव घेत नाही. अशी परिस्थिती आहे. शुक्रवारी अॅडिलेड विमानतळ रात्रभर खुले होते. अधिकार्‍यांनी सांगितले, की असे पहिल्यांदा झाले आहे.
अॅडिलेड विमानतळाच्या लॉनवर लोक आपल्या सामानासह हजर आहेत. दोन्ही देशांचे जवळपास पाच हजार फॅन्स विमानतळावर आहेत. विमानतळ प्रशासनाचे प्रयत्न आहेत, की आता येथेच मोठी स्क्रिन लावली जावी. ज्यामुळे ज्या चाहत्यांना सामन्याचे तिकीट मिळाले नाही ते स्क्रिनवर त्याचा आनंद घेतील. दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये आपापल्या संघाविषयी एवढे प्रेम आहे, की सरावावेळीही मैदानावर हजारोच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. भारतीय चाहत्यांचे येथील 'स्वामी आर्मी' या ग्रुपने स्वागत केले. टीम इंडियाला चेअरअप करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. भारतीय चाहत्यांना मोफत आयस्क्रिमची ऑफर त्यांनी दिली आहे.