आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अ‍ॅडिलेड’ खेळपट्टीवरही लागणार टीम इंडियाचा कस!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील 4-0 पराभव टाळण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला कसोटीआधीच मोठा धक्का बसला. अ‍ॅडिलेड मैदानाची खेळपट्टी तयार करणारे क्युरेटर डॅमियन हॉग यांनी आज या खेळपट्टीबाबत माहिती देताना म्हटले आहे की, ‘खेळपट्टीवर भरपूर गवत असेल. खेळपट्टीवरून चेंडू अधिक उसळेल.’
हॉग म्हणाले, ‘या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना निश्चितच अधिक साहाय्य होईल. त्यानंतर दुसºया व तिसºया दिवशी ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल. शेवटच्या दोन दिवसांच्या खेळात चेंडूला असमान उसळी मिळेल.’
डॅमिसन हॉग म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियन संघाकडून त्यांना हवी तशी खेळपट्टी तयार करण्याबाबत कोणताही दबाव आणण्यात आला नाही. चांगली खेळपट्टी तयार करणे हे माझे काम आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार या तीन दिवशी हवामानाचा फटका बसू शकतो. कसोटीला सुरुवात होईपर्यंत उष्णता 36 ते 37 डिग्रीवर पोहोचेल, असा अंदाज आहे. उष्णतेमुळे खेळपट्टीवर काही परिणाम होणार नाही यासाठी पुरेसे गवत ठेवण्यात आले आहे.
या मालिकेतील सामने पाचव्या दिवसावर गेलेच नाहीत. याबाबत काळजी करणे माझे काम नाही. अ‍ॅडिलेडची प्रतिष्ठा जपणारी खेळपट्टी तयार करणे
हे माझे काम आहे, असे ह्यूज म्हणाले. या
खेळपट्टीवर शेवटच्या दोन दिवसांत फिरकी गोलंदाजही आपले कर्तृत्व दाखवू शकतील, असेही ह्यूज यांनी शेवटी म्हटले.’

फ्लॅशबॅक!
चौथ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची तुलना दोन वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीशी केली जाते. त्या वेळी इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर एक डाव व 71 धावांनी मात केली होती. त्या वेळी करण्यात आलेली खेळपट्टीही अशीच होती. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 245 धावा केल्या होत्या. इंग्लंडने त्या धावसंख्येला 610 धावांचे प्रत्युत्तर दिले होते. ऑस्ट्रेलियाची दुसºया डावातही घसरगुंडी उडाली होती.