आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्यच्या फटक्याने आयपीएलला चढली रंगत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वानखेडेवर युवा खेळाडू आदित्य तारेने विजयी षटकार मारून यजमान मुंबई इंडियन्सचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. यासह त्याने या तुफानी आणि रोमहर्षक षटकारासह यंदाच्या सातव्या सत्रातील आयपीएलमध्ये चांगलीच रंगत आणली. यासह 87 चेंडूंत 190 धावांचे अशक्यप्राय आव्हान आदित्य तारेच्या विजयी षटकाराने मुंबई इंडियन्सला गाठता आले. या विजयासह मुंबई इंडियन्सने राजस्थानच्या बाद स्वप्नावर पाणी फेरले.
अँडरसन प्रथमच पुरस्काराचा मानकरी
स्फोटक फलंदाज कोरी अ‍ॅँडरसनने आयपीएलमध्ये प्रथमच सामनावीरचा बहुमान पटकावला. मुंबई इंडियन्सकडून रविवारी रात्री त्याने 44 चेंडूंमध्ये नाबाद 95 धावांची खेळी केली.
नायरचे चौथे अर्धशतक
राजस्थानच्या करण नायरने (50 धावा 27 चेंडू) मुंबईविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याचे आयपीएलमधील हे चौथे अर्धशतक ठरले. तसेच यंदाच्या सत्रातील तिसरे अर्धशतक आहे.
संजू सॅमसनची सर्वोत्कृष्ट कामगिरी
राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनने यंदाच्या सत्रात सर्वोत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने गत सामन्यात मुंबईविरुद्ध 47 चेंडंूत 74 धावांची खेळी केली. यासह त्याने सत्रातील सर्वोत्कृष्ट खेळीची नोंद आपल्या नावे केली. याशिवाय युवा खेळाडू संजू सॅमसनने टी-20 मध्ये एक हजार धावांचा पल्लाही यशस्वीपणे गाठला. यात सात अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 48 सामन्यांत 24.78 च्या सरासरीने 1016 धावा पूर्ण केल्या.