आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advanced Equipment Every District Get In Maharashtra

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांना मिळणार अत्याधुनिक साहित्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीसीसीआयच्या मैदानांचा दर्जा सुधारण्यासाठीच्या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्हा क्रिकेट संघटनांच्या मैदान समित्यांच्या प्रतिनिधींसाठी पुण्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक, औरंगाबाद, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर आदी बीसीसीआयशी संबंधित क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणा-या केंद्रांना अत्याधुनिक क्रीडा साहित्य पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पुढाकार घेऊन पुण्यात या कार्यशाळेचे आयोजन केले होते.


या वेळी मैदान तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य, यंत्रणा व त्याचा कसा वापर करावा, याची माहिती देण्यात आली. खेळपट्टी कशी तयार करावी, त्यावर रेलिंग कसे करावे, गवत कसे वाढवावे व कापावे, मैदान कसे तयार करावे, खेळपट्टीचा व मैदानाचा मध्य कसा काढावा, यापासून सीमारेषा कशी आखावी, याबाबत माहिती देण्यात आली.सुपर सॉपर मशीनमुळे फक्त पावसाचेच नाही, तर दवाचे पाणीही कसे शोषून घ्यायचे, हे दाखविण्यात आले.
बीसीसीआयकडून राज्यातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणा-या केंद्रांना लवकरच एमसीएमार्फत यंत्रसामग्रीही मिळणार आहे. या अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या वापराचे ज्ञान देण्यासाठी अशा कार्यशाळा नजीकच्या काळात जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.


नाईक यांचे मार्गदर्शन
बीसीसीआयच्या क्युरेटर कमिटीचे पश्चिम विभागाचे सदस्य सुधीर नाईक यांनी महाराष्ट्राच्या 21 जिल्ह्यांमधून आलेल्या 40 प्रतिनिधींना दोन सत्रांमध्ये खेळपट्टी आणि मैदान कसे दर्जेदार करावे याबाबत मार्गदर्शन केले.