आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afgan Versus Hangkong Match News In Marathi, T 20 World Cup

टी-20 विश्‍वचषक: अफगाणची हाँगकाँगवर 7 गड्यांनी मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चितगाव - अफगाणिस्तानने विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत हॉँगकॉँगचा पराभव केला. या टीमने मंगळवारी 7 गड्यांनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणने पात्रता फेरीतील आपला दावा अधिक मजबूत केला. मात्र, दोन पराभवांनी हाँगकाँगला पात्रता फेरीतून बाहेर पडावे लागले. तसेच बांगलादेशने नेपाळला 8 गड्यांनी पराभूत केले होते.


सलामीवीर मोहंमद शहजाद (68) आणि शफिकल्लाह (नाबाद 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर अफगाणने सामना जिंकला.प्रथम फलंदाजी करताना हॉँगकॉँगने 8 बाद 153 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 3 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. अफगाणकडून असगर (13) आणि मो. शहजादने दुस-या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शहजाद व शफिकल्लाहने तिस-या गड्यासाठी 47 धावांची भागीदारी करताना संघाच्या विजयाचा मार्ग सुकर केला. शफिकल्लाह आणि नबी (नाबाद 6) यांनी अफगाणला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, हॉँगकॉँगकडून वकास बार्केट (32), कर्णधार अटकिन्सन (31) आणि चॅम्पमन (38) यांनी दमदार खेळी केली.