आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Afghanistan V Pakistan, Asia Cup News In Marathi

आशिया चषक : उमर अकमलचे शतक; पाकिस्तान विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फातुल्ला - पाकिस्तान संघाने गुरुवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानला 72 धावांनी पराभूत केले. पाकचा स्पर्धेतील हा पहिला विजय ठरला. यापूर्वी सलामी सामन्यात श्रीलंकेने पाकला हरवले होते. पाकचा स्पर्धेतील तिसरा सामना 2 मार्चला भारताशी होईल.

सामनावीर उमर अकमलच्या नाबाद 102 धावा व मोहम्मद हाफिजच्या (3/29) धारदार गोलंदाजीच्या बळावर पाकने सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पाकने 8 बाद 248 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 47.2 षटकांत अवघ्या 176 धावांत गाशा गुंडाळला.

पाकिस्तानच्या डावात उमर अकमलने अखेरच्या षटकात दौलत जादरानच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून वनडेतील आपले दुसरे शतक ठोकले. श्रीलंकेविरुद्ध मागच्या सामन्यात 74 धावा काढणार्‍या या 23 वर्षीय युवा फलंदाजाने आपल्या खेळीत सात चौकार आणि 3 षटकार मारले. त्याच्याशिवाय सलामीवीर अहेमद शाहजादने 50 धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : 8 बाद 248 ( अकमल नाबाद 102, शाहजाद 50, 2/34 शेनवारी,अफगाणिस्तान : सर्वबाद 176 (नुर 44, 3/29 हाफिज).

अकमलला जीवदान
अकमल 28 धावांवर असताना शेनवारीने त्याचा सोपा झेल सोडला. हा झेल अफगाणला चांगलाच महागात पडला. अकमलने अन्वर अली (21) सोबत सातव्या विकेटसाठी 60 धावा व उमर गुलने (15) आठव्या विकेटसाठी 50 धावांची उपयोगी भागीदारी केली.

अफगाणिस्तानकडून मीरवाईस अश्रफने चांगली गोलंदाजी केली. त्याने आठ षटकांत 29 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट गमावल्या. शेनवारीने 34 धावा आणि दौलत जादरानने 73 धावांत प्रत्येकी दोघांना बाद केले.