आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांद्रेच्या गाेलने घानाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; 83 व्या मिनिटाला केला गोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माेंगाेमाे - अांद्रेने केलेल्या शानदार गाेलच्या बळावर घाना संघाने अाफ्रिकी नेशन्स चषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या वेळी घानाने सामन्यात दक्षिण अाफ्रिकेचा २-१ अशा फरकाने पराभव केला. दाेन्ही संघांतील ही रंगतदार लढत ८२ व्या मिनिटापर्यंत १-१ ने बराेबरीत हाेती. मात्र, त्यानंतर ८३ व्या मिनिटाला अांद्रेने हेडरने गाेल करून घानाचा विजय निश्चित केला.
यजमान अाफ्रिका संघाने घरच्या मैदानावर १७ व्या मिनिटाला सामन्यात गाेलचे खाते उघडले. यासह अाफ्रिकेने १-० ने अाघाडी घेतली. मात्र, ७३ व्या मिनिटाला जाॅन बाॅयने गाेल करून घानाला १-१ ने बराेबरी मिळवून दिली हाेती.