आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Africa Vs India Under 19 Cricket News In Marathi, Divyamarathi

भारताचा आफ्रिकेकडून पराभव; विजय झोलचे अर्धशतक व्यर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- बुधवारी झालेल्या आयसीसी 19 वर्षाखालील वर्ल्डकप सराव सामन्यात सी. फॉट्युनच्या (112*) नाबाद शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिकाने भारतावर 5 गडी राखून मात केली. मिळवला. भारताचा कर्णधार विजय झोलचे (59) अर्धशतक व्यर्थ गेले.

प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 बाद 234 धावा काढल्या. विजय झोलने 99 चेंडूत 6 चौकाराच्या मदतीने 59 धावा काढल्या. रिकी भुई (56) व सरफराज खानने (53) शानदार अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 43.3 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. सलामीवीर ए.के. मार्करामने 41 व सी. फॉट्युनने नाबाद 112 धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 112 चेंडूत 9 चौकार व 3 षटकार खेचत शतक ठोकले.
भारताच्या कुलदीप हुड्डाने 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : ( भारत 6 बाद 234. विजय झोल 59, रिकी भुई 56, सरफराज खान 53 धावा. के. राबडा 2/18. दक्षिण आफ्रिका 5 बाद 235. मार्कराम 41, सी. फॉट्युन नाबाद 112 धावा. कुलदीप हुड्डा 2/38.)