आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तपांनंतर फर्ग्युसन यांचा युनायटेडला अलविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - तब्बल दोन तपांपेक्षा अधिक काळ कोचिंग करणारे प्रशिक्षक अ‍ॅलेक्स फर्ग्युसन यांनी मँचेस्टर युनायटेडला अलविदा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेडने यंदाच्या सत्रात इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. यासह युनायटेडने 20 वेळा ईपीएलचा चषक आपल्या नावे केला. तसेच 1999 आणि 2008 मध्ये युनायटेडने युरोपियन चषकदेखील पटकावला. अशी उल्लेखनीय कामगिरी करणारे प्रशिक्षक फर्ग्युसन यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला.


6 नोव्हेंबर 1986 ला प्रशिक्षकपदी
एलेक्स फर्ग्युसन यांनी 6 नोव्हेंबर 1986 मध्ये मॅँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या युनायटेडचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करताना फर्ग्युसन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र, त्यांनी दर्जेदार फुटबॉलपटूंना एकत्र करून युनायटेडला मजबुती दिली. त्यानंतर युनायटेडने विजयी कामगिरी केली.


प्रसारमाध्यमांकडून स्तुती
युनायटेडला 27 वर्ष कोचिंग करणा-या प्रशिक्षक फर्ग्युसन यांच्यावर प्रसारमाध्यमांनी स्तुतिसुमने उधळली. सर फर्ग्युसन हे फुटबॉलच्या विश्वातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक आहेत, अशा शब्दांत इंग्लंडच्या प्रसारमाध्यमांनी कौतुक केले.


मोसेस नवे प्रशिक्षक
इव्हर्टनचे मोसेस यांची मॅचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. फर्ग्युसन यांच्या जागी ते पदाची सूत्रे स्वीकारतील.