Home | Sports | From The Field | after 26 years new zeland won the match against aussee

तब्‍बल सव्‍वीस वर्षांनंतर न्‍यूझीलंडने कांगारूंवर मिळवला विजय

वृत्तसंस्था | Update - Dec 12, 2011, 11:09 AM IST

जलद गोलंदाज डग ब्रासवेलच्‍या वादळासमोर डेव्हिड वॉर्नर (नाबाद 123) वगळता एकही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. ब्रासवेलने 40 धावांच्‍या बदल्‍यात सहा कांगारूंना तंबूत पाठवले.

  • after 26 years new zeland won the match against aussee

    होबार्ट- न्‍यूझीलंडने अत्‍यंत रोमहर्षक ठरलेल्‍या सामन्‍यात ऑस्‍ट्रेलियाचा सात धावांनी पराभव करून दुसरी कसोटी जिंकली आहे. 1985 नंतर पहिल्‍यांदाच न्‍यूझीलंडने ऑस्‍ट्रेलियाला त्‍यांच्‍याच देशात पराभवाचे पाणी पाजले आहे. किवी संघाने ऑस्‍ट्रे‍लियाचे शेवटचे आठ गडी फक्‍त 74 धावांत तंबूत धाडले.
    ऑस्‍ट्रेलियाला दुस-या डावात जिंकण्‍यासाठी 241 धावांची आवश्‍यकता होती आणि त्‍यांचा संघ दोन गडयांच्‍या बदल्‍यात 159 धावा अशा मजबूत स्थितीत होता. परंतु, जलद गोलंदाज डग ब्रासवेलच्‍या वादळासमोर डेव्हिड वॉर्नर (नाबाद 123) वगळता एकही फलंदाज मैदानात टिकू शकला नाही. ब्रासवेलने 40 धावांच्‍या बदल्‍यात सहा कांगारूंना तंबूत पाठवले. पहिली कसोटी ऑस्‍ट्रेलियाने नऊ गडयांनी जिंकली होती.Trending