आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवार ४ वर्षांनंतर जाणार बीसीसीआयच्या सभेला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या २० नोव्हेंबरला चेन्नईत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तब्बल चार वर्षांनंतर त्यांनी सभेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या वेळी त्यांच्या सभेतील सहभागाच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिल्याची माहिती एमसीएचे संयुक्त सचिव नितीन दलाल यांनी दिली.
आयसीसीच्या चेअरमनपदी विराजमान झालेल्या श्रीनिवासन यांना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या भूमिकेत कार्य करण्यास मनाई केली आहे. आयपीएल सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगप्रकरणी नुकताच मुद्गल समितीने आपला चाैकशी अहवाल सादर केला आहे.