आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Permission Of Legalised Betting, IPL Problem Solve Rajpal Singh

सट्टेबाजीला कायदेशीर दर्जा दिल्यानंतर आयपीएलचा प्रश्न सुटेल - राजपाल सिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यामुळे आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू कमी होईल. खेळ हा चाहत्यांच्या विश्वासावरच टिकून असतो. अविश्वासूपणामुळे त्या खेळाची प्रतिष्ठा कमी होते. त्याचा परिणाम खेळाच्या ब्रँड व्हॅल्यूवर पडतो. तसेच या खेळाशी संबंधित सर्वच गोष्टींना त्याचा मोठा फटका बसतो. त्यामुळे सट्टेबाजीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
त्यामुळे या सट्टेबाजाला कायदेशीर दर्जा मिळावा. देशात एका वर्षात तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा सट्टा लावला जातो. यावर कर लावल्यास सरकारला तब्बल १२ ते २० हजार कोटी रुपयांचा आयकर मिळेल. यातून खेळ व खेळाडूंचा विकास होईल, असे फिक्कीचे राजपाल म्हणाले.