आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिननंतर कोण ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साठच्या दशकातील गोष्ट आहे. त्या वेळी राजकीय वर्तुळात एका विषयावर अत्यंत गंभीर आणि जोरदार चर्चा सुरू होती. अनेकांना एकच प्रश्न पडला होता, की नेहरूंनंतर आता कोण ? देशाच्या पहिल्या पंतप्रधानांचे नेतृत्व त्या वेळी असे होते की चीनविरुद्ध 1962 च्या युद्धानंतर ते दुबळे ठरले. तेव्हा जनतेला युवा भारताच्या नेतृत्वाची चिंता भेडसावत होती. 1964 मध्ये पं. नेहरूंचे निधन झाले. पुढे जे घडले ती इतिहास आहे. तो सर्वांनाच माहीत आहे.
वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडीजविरुद्ध दुस-या कसोटीच्या दुस-या दिवशी नरसिंह देवनारायणच्या चेंडूवर डॅरेन सॅमीने सचिनचा झेल घेतला. सचिन 74 धावांवर बाद झाला. गेली 25 वर्षे जो सर्वांचा हीरो होता, तो हळूहळू कायमचा पॅव्हेलियनकडे परत जात होता. तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले सारेच स्तब्ध झाले होते. वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित तमाम चाहत्यांसह क्रीडा जगताला एकच प्रश्न पडला, सचिननंतर कोण? भारतीय क्रिकेटमध्ये अनेक हीरो झाले. मात्र, मास्टर ब्लास्टरची उंची निर्विवाद आहे.
दुपारपासूनच अस्वस्थता पसरली होती. सचिनने आपली आई, पत्नी, भाऊ, मुले आणि अनेक दिग्गज चाहत्यांसमोर जबरदस्त फेअरवेल खेळी केली. त्याने 12 चौकारसुद्धा मारले. तो पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहते आपल्या हीरोच्या सन्मानार्थ उभे झाले. टाचणी पडली तरीही आवाज होईल इतकी भयाण शांतता पसरली होती. मात्र, स्टेडियममधील या शांततेत एक अस्वस्थता होती.
सचिनने आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत जबरदस्त योगदान दिले. यामुळे भारतीय क्रिकेटमधून सचिनच्या निवृत्तीनंतर निर्माण होणारी पोकळी भरून निघणे जवळजवळ अशक्य आहे. सचिन पॅव्हेलियनमध्ये जाताच ग्रँडस्टँडमध्ये उपस्थित असलेले अनेक व्हीआयपीही स्टेडियमबाहेर पडले. सचिनची फायनल खेळी बघितल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकसभेचे
माजी अध्यक्ष मनोहर जोशी, अभिनेता आमिर खान, आशुतोष गोवारीकर, रितेश देशमुख परतले. सचिनचे संपूर्ण कुटुंब सुद्धा एमसीए बॉक्समधून जेवणाच्या वेळेपर्यंत बाहेर पडले. फक्त सचिनचा मुलगा अर्जुन त्यांच्यासोबत गेला नाही. त्यावेळी अर्जुन सीमारेषेजवळ बॉलबॉय म्हणून उभा होता. एमसीएचे प्रमुख शरद पवार राजकीय व्यस्ततेमुळे सकाळी उपस्थित नव्हते. ते जेवणाच्या वेळेनंतर परतले. यानंतर भारताकडून शतक ठोकणारे चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीपेक्षा सचिनशिवाय भारतीय क्रिकेटचे भविष्य काय आणि कसे असेल, यावरच अधिक चर्चा सुरू होती. ही कसोटी फक्त सचिनची होती, हे स्पष्टच आहे. रोहित शर्माने सलग दुस-या कसोटीत नाबाद शतक ठोकले. त्याने कोलकात्यात 177 धावा काढल्या होत्या. यानंतरही सचिनची आजची खेळी त्याच्या नाबाद शतकावर वरचढ ठरली.
आपल्या दुस-याच कसोटीत खेळत असलेला रोहित शर्मा सचिनच्या पावलावर चालू शकेल काय ? वानखेडे स्टेडियमवर संपूर्ण दिवस चर्चेत असलेल्या प्रश्नांना तो उत्तर देऊ शकेल काय ? सचिननंतर कोण आहे ? या अवघड प्रश्नाचे उत्तर शोधण्याची ही बहुदा योग्य वेळ नसावी. अखेर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे विसरता येणार नाही.