आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायना पुन्हा नंबर वन क्वीन, सानियासह सायनाचीही प्रगती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लंडन अाॅलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने पुन्हा एकदा जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानाचे सिंहासन काबीज केले अाहे. याशिवाय गत अाठवड्यात टेनिसपटू सानिया मिर्झानेही दुहेरीच्या अव्वल स्थानावर धडक मारली. हैदराबादच्या या दाेन्ही महिला खेळाडूंनी खेळामध्ये देशाचा नावलाैकिक उंचावला अाहे.

दाेन अाठवड्यांत सायनाने हे यश दुस-यांदा संपादन केले. चीनची ली झुइरुईची तिस-या स्थानावर घसरण झाली अाहे. अव्वल स्थान गाठणारी सायना ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली अाहे. इंडिया अाेपन ग्रँड प्रिक्स बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावल्यानंतर सायनाने हे स्थान पटकावले. मलेशिया अाेपनमधील पराभवाने तिची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली हाेती. सायना गत अाठवड्यात सिंगापूर अाेपन सुपर सिरीज स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. तसेच चीनच्या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे क्रमवारीत तिला दाेन स्थानांचा माेठा फटका बसला. स्पेनची मारीन कॅराेलिनाने दुसऱ्या स्थानावर धडक मारली. दुसरीकडे महिला गटात भारताच्या सिंधूला टाॅप-१० मधून बाहेर पडावे लागले. तिला अाता १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
कश्यप चाैथ्या स्थानी : पुरुष गटात के. श्रीकांतने जागतिक क्रमवारीतील चाैथे स्थान कायम ठेवले. पी. कश्यपने १४ वे स्थान गाठले. त्याला एका स्थानाचा फायदा झाला. प्रणयची १५ व्या स्थानावर घसरण झाली.