आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोषींची हकालपट्टी, फिक्सिंगनंतरही क्रिकेटची प्रतिष्ठा कायम राहणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतलेल्या संघांच्या गच्छंतीमुळे देशातील क्रिकेट प्रकल्प कोसळणार नाहीत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नियम म्हणजे अतिपवित्र गोष्ट नव्हे, असा निष्कर्ष नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने देशातील क्रिकेटचे नियंत्रण करणा-या प्रमुख क्रिकेट संघटनेभोवतालचा पाश आणखी घट्ट केला.

आयसीसीचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि त्यांची आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यावर टीकेचे आसूड ओढत न्यायालयाने खेळाचे पावित्र्य महत्त्वाचे असून क्रिकेटची प्रतिमा स्वच्छ राखण्यासाठी बीसीसीआयचे ६.२.४ हे कलम रद्द करण्याची गरज असल्याचे सूतोवाच या वेळी केले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कलम ६.२.४ नुसार द्विहितसंबंधांना परवानगी देण्यात आली आहे. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग क्रिकेटमध्ये खेळणा-या फ्रँचायझींची मालकी किंवा सहमालकी किंवा भागीदारी स्वीकारण्याची मुभा बीसीसीआयच्या पदाधिका-यांना देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चेन्नई सुपरकिंग्ज संघाला वगळता अन्य फ्रँचायझींमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्याअन्य प्रशासकीय अधिका-यांची भागीदारी आहे का, हेही स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याआधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल सीईओ सुंदर रमण यांना कथित भ्रष्टाचाराची कल्पना असूनही बघ्याची भूमिका घेतल्याबद्दल फटकारले होते.