लंडन - दोन दिवसांपूर्वी मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर आपण ओळखत नसल्याचे विधान करुन क्रीडाजगतामध्ये टीकेचे धनी बनलेली मारिया शारापोव्हा बॉयफ्रेंड दिमित्रोवचा सामना पाहण्याठी मैदानात पोहोचली. या सामन्यामध्ये सर्बियाच्या
नोवाक जोकोविचने दिमित्रोवला पराभूत करुन अंतीम फेरीत धडक दिली आहे.
माजी चॅम्पियन नोवाक जोकोविचने सेंट्रल कोर्टवर पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोवचा 6-4, 3-6, 7-6(7-2), 7-6(9-7) अशा फरकाने पराभव केला.
मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचे टेनिसप्रेम सर्व जगाला माहित आहे. तेंडुलकर न चुकता विम्बल्डनच्या स्पर्धा बघायला इंग्लडला जात असतो. 28 जून रोजी सचिन तेंडुलकर, माजी फुटबॉलपटू डेविड बॅकहम आणि गोल्फपटु इयॉन पॉल्टर सोबत सेंट्रल कोर्टमध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत होते.
सचिनला नाही ओळखत
फुटबॉलपटू डेव्हिड बॅकहॅम, गोल्फपटू इयॉन पॉल्टर व ऍन्ड्रय़्रू स्ट्रॉस यांचा प्रेक्षक गॅलरीमध्ये बसले आहेत याबाबत शारापोव्हाला माहिती देण्यात आली, तुला सचिन तेंडुलकर माहिती आहे का’, असा प्रश्न विचारला गेला असता शरापोव्हाने त्याचे नकारार्थी उत्तर दिले. तिने बेकहॅमबद्दल कल्पना आहे. पण, सचिनबद्दल माहिती नाही, असे सांगितले होते.
(फोटोओळ- बॉयफ्रेंड दिमित्रोवचा खेळ बघताना मारिया शारापोव्हा )
पुढील स्लाइडवर पाहा, शारापोव्हाची छायाचित्रे..