आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंदुरुस्तीनंतरच कमबॅक : इरफान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अष्टपैलू इरफान पठाणला क्रिकेटमध्ये पुनरागमनाची कसलीच घाई नाही. फिटनेसचे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पुनरागमन करणार असल्याचे इरफानने म्हटले. असे असले तरीही इरफानने स्वत:ला फिट असल्याचे म्हटले आहे.

सुनंदन लेले यांनी भारत-पाकिस्तानवर लिहिलेल्या पुस्तकाच्या विमोचन प्रसंगी इरफान पुण्यात आला होता. या वेळी मीडियाशी बोलताना त्याने ही माहिती दिली. मागच्या वर्षी मी चांगला खेळत असताना गुडघ्याला दुखापत झाली. मी कसोटीत पुनरागमनाचे प्रयत्न केले. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे ते शक्य झाले नाही, असे तो म्हणाला.
पुनरागमनाबाबत प्रश्नावर इरफान म्हणाला, ‘एका आठवड्यानंतर मी बंगळुरूला परत जाणार आहे. या वेळी मी फिटनेस सर्टिफिकेटशिवाय पुनरागमन करणार नाही, तर आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. त्यानंतर मी बडोद्यात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 मध्ये खेळण्यास सज्ज असेन. यानंतर राष्‍ट्रीय संघात पुनरागमन करेन.’