आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • After Winning Her Match, Tennis Player Michaella Krajicek Gets An Proposal On Court

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेनिस कोर्टवरच केले प्रपोज, गर्लफ्रेन्डने होकार देताच घातली एंगेजमेंट रिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टेनिस कोर्टवर मिचैला हिला लग्नासाठी प्रपोज करताना एमरिच)
हेरटोगेनबोस्क - नेदरलॅँडची टेनीस स्टार मिचॅला क्राजिसेक यासाठी आज खुप आनंदाचा दिवस आहे. मिचॅलाने आपल्या टेनीस करिअरमध्ये अनेक सामने जिंकले असतील, मात्र या विजयाचा आनंद त्या इतर विजयांपेक्षा खुपच वेगळा होता. कारण, मिचॅलाने टॉप सेल्फ ओपनच्या सामन्यात जसा विजय मिळवला, तसा तिचा बॉयफ्रेंड मार्टीन एमरिचने टेनीस कोर्टामध्ये घुसून तिला लग्नासाठी प्रपोज केले. मार्टिनच्या या प्रपोजचा मिचॅलाने आनंदाने स्वीकारही केला. मिचॅला क्राजिसेकचा माजी विंम्बल्डन विजेता रिचर्ड क्राजिसेक याची सावत्र बहिण आहे.

असे केले प्रपोज आणि घातली अंगठी
मातृभूमीवर सुरू असलेल्या टॉप शेल्फ ओपन स्पर्धेच्या एका सामन्यात मिचॅला क्राजिसेक ही जाना सेपेलोवा हिच्या विरूध्द खेळत होती. तिने सेपोलावर सहज विजय मिळवला. यानंतर ती प्रेक्षकांमध्ये बसलेला तिचा बॉयफ्रेन्ड एमरिचकडे विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी वळणार तेवढ्यात एमरिच स्वतः मैदानात उतरला. मिचॅलाला काही समजण्याच्या आतच त्याने गुडघ्यावर बसून सर्व प्रेक्षकांसमोर प्रपोज केले. मिचॅलानेही त्याचे प्रपोज अंतःकरणापासून स्वीकारले.

काय म्हणाला मार्टिन आपल्या या प्रपोज स्पीचमध्ये
गु़डघ्यावर बसून इमरिच (29) त्याची गर्लफ्रेंड मिचॅला (25) म्हणाला, "10 महिन्यांपर्यंत तुझ्या सोबत होतो... मात्र आता तुझ्यासमवेत संपुर्ण आयुष्य राहायचे आहे. मी तुला वचन देतो की, तुझ्याशी मी नेहमी प्रामाणिक राहिल. माझ्या आयुष्यात मी सर्वात जास्त तुझ्यावर प्रेम करतो... आज मी तुझ्या सुंदर डोळ्यांमध्ये पाहून या तमाम प्रेक्षकांसमोर तुला विचारतो... की माझ्याशी लग्न करशील?"

विशेष म्हणजे मागील 1 वर्षांपासून एमरिच आणि मिचॅला रिलेशनशिपमध्ये आहे. या दरम्यान त्यांची पहिली भेट 'टॉप शेल्फ ओपन-2013' दरम्यान झाली होती.

मिचॅलाच्या टेनीस करिअरवर एक नजर

तीन वेळा डब्ल्यूटीए सिंगल पुरस्कार विजेता
एक डब्ल्यूटीए दुहेरी पुरस्कार विजेता
पुरस्काराची रक्कम: जवळपास 10 कोटी रुपये

पुढील स्लाईडमध्ये पाहा... कशा प्रकारे एमरिचने मिचॅलाला केले प्रपोज... व्हिडीओही पाहा...