आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिकेटला पुन्हा एकदा सभ्यतेचे स्वरूप प्राप्त होईल - आदित्य वर्मा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता क्रिकेटला पुन्हा एकदा सभ्यतेचे स्वरूप प्राप्त होईल, असे मत बीसीसीआयच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून न्यायालयात याचिका दाखल करणा-या आदित्य वर्मा यांनी मांडले. आयपीएलमधील वाढता भ्रष्टाचार आणि स्पॉट फिक्सिंगवर अंकुश ठेवण्यासाठी मी मैदानात उरतलो होतो.
बीसीसीआयची प्रतिमा स्वच्छ करण्याचा माझा उद्देश होता. तसेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त व्हावे, यासाठीच मी प्रयत्नशील होतो. श्रीनिवासन यांनी आपल्या कार्यकाळात आपल्या ब-याच नातेवाइकांना नियमाचे उल्लंघन करून कामे दिली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.