आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूर ओपन सुपर सिरीज : सायना नेहवालकडून पुन्हा निराशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या सायना नेहवालने शुक्रवारी पुन्हा एकदा आपल्या तमाम चाहत्यांची निराशा केली. तिला सिंगापूर ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनेत्रीने भारताच्या खेळाडूवर 17-21, 21-13, 21-13 अशा फरकाने विजय मिळवला. यासह तिने सायनाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच विजयासह इंडोनेशियाच्या खेळाडूने उपांत्य फेरीत धडक मारली.


भारताच्या सायना नेहवालने पहिल्या गेममध्ये दमदार सुरुवात करून बाजी मारली. तिने तीन गुणांची कमाई करून 17-13 ने आघाडी मिळवली. त्यानंतर ही लय अबाधित ठेवत तिने पहिला गेम 21-17 ने जिंकला. त्यानंतर दुस-या गेममध्ये फेनेत्रीने दमदार पुनरागमन केले. तिने सुरेख स्मॅश मारून आघाडी मिळवली. तिने सायनाला पिछाडीवर टाकून दुसरा सेट आपल्या नावे केला. इंडोनेशियाच्या खेळाडूने तिस-या सेटमध्येही दबदबा कायम ठेवला.
सायनाला चार मोठ्या स्पर्धेत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.