आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित आगरकर, आदित्‍य तारेच्‍या शतकामुळे मुंबई सुस्थितीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कर्णधार अजित आगरकर आणि आदित्‍य तारे यांच्‍या शतकामुळे गुरूवारी मुंबई संघाने सेनादलविरूद्धच्‍या उपांत्‍य सामन्‍यात दिवसाअखेर सहा विकेटच्‍या बदल्‍यात 380 धावा केल्‍या आहेत.

आगरकरने कारकीर्दीतील सर्वश्रेष्‍ठ कामगिरी करताना नाबाद 113 धावा बनवल्‍या. प्रथमश्रेणी सामन्‍यातील त्‍याचे हे चौथे शतक होते. तारेने संथ फलंदाजी करताना 108 धावांवर खेळत आहे. सलग दुस-यादिवशी अपु-या सुर्यप्रकाशामुळे सामना लवकर थांबवण्‍यात आला.

आगरकरने 237 चेंडूचा सामना करताना 14 चौकार मारले तर तारेने 324 चेंडू खेळत 16 चेंडूंना सीमापार धाडले. त्‍यांनी सातव्‍या विकेटसाठी 211 धावांची नाबाद भागीदारी केली. सेना दलाच्‍या गोलंदाजांनी पालम मैदानावर सुरू असलेल्‍या सामन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी तेंडुलकरसहित सहा फलंदाजांना तंबूत धाडले होते. मात्र, आज दिवसभराच्‍या 65 षटकात त्‍यांना एकही विकेट मिळवता आली नाही.