आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन सिनाच्या गर्लफ्रेंडची रिंगमध्ये अशी झाली धुलाई, लक्षविचलित करुन जिंकला सामना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निक्की बेलावर उडी घेऊन अटॅक करणारी एजे ली. - Divya Marathi
निक्की बेलावर उडी घेऊन अटॅक करणारी एजे ली.
मियामी - WWE च्या रेसलमॅनिया इव्हेंटमध्ये बेला ट्विंस अर्थात निक्की आणि ब्राई बेला यांना माजी दिवा चॅम्पियन एजे ली आणि पेजकडून पराभव पत्करावा लागला. जवळपास अर्धातास चाललेल्या फाइटमध्ये जॉन सीनाची गर्लफ्रेंड निक्की आणि तिची बहिण ब्राई सुरुवातीला पेज आणि लीवर वरचढ ठरली होती. मात्र शेवटी विरोधी जोडीने जोरदार पुनरागमन करत मॅच आपल्या नावे केली. विशेष म्हणजे निक्की आणि ब्राई यांनी नुकत्याच झालेल्या एका स्पर्धेत पेज आणि एजेला पराभूत करुन किताब जिंकला होता.
फिल्मी स्टाइल एन्ट्री
फाइटसाठी रिंगमध्ये येताना बेला ट्विंसने फिल्मी स्टाइल एन्ट्री केली. दोघींनी आपल्या सिग्नेचर स्टाइलमध्ये अर्थात दोरीला पकडून बॅक जंप करुन रिंगमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोघींनी एजेची मनसोक्त धुलाई केली. फाइट सुरु झाल्यानंतर काही वेळातच एजे रिंगबाहेर फेकली गेली होती. तर, तिची सहकारी पेज रिंगमध्ये संघर्ष करत होती.
लक्ष चुकवून जिंकली लढत
एजे काही वेळानंतर उठली आणि ब्राई व निक्कीचे लक्षविचलीत करु लगली. तिची पार्टनर रिंगमध्ये असतानाही ती पुन्हा-पुन्हा रिंगमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागली (नियमानुसार लढतीचा निर्णय लागेपर्यंत जोडीदारापैकी एकच फायटर रिंगमध्ये राहू शकते ) त्यामुळे निक्कीने एजेला सांभाळण्याचे काम सुरु केले आणि दोघी रिंग बाहेरच भिडल्या. मात्र निक्की पेक्षा एजे चपळ निघाली आणि ती रिंगमध्ये दाखल झाली. संधी मिळताच तिने तिची सिग्नेचर मुव्ह ब्लॅक मिरर ब्राईवर आजमावली. ब्राईला ब्लॅक मिररमधून बाहेर पडेपर्यंत सामना समाप्तीची घंटा वाजली आणि एजे व पेज या जोडीला विजयी घोषित करण्यात आले.
पुढील स्लाइडवर फोटोमधून पाहा, रोमांचक फाइट
बातम्या आणखी आहेत...