आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंजना ठमकेचा डबल बार, 4 बाय 400 रिलेत जिंकले सुवर्ण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मलेशियातील आशियाई शालेय स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी झालेल्या 4 बाय 400 रिले प्रकारात अंजनाने अखेरच्या टप्प्यात केलेल्या जोरदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने आणखी एक सुवर्णपदक पटकावले. भारतीय संघाने स्पर्धेत 29 पदकांची कमाई करत दुसरे स्थान गाठले. यजमान मलेशिया 36 पदकांसह अव्वलस्थानी आहे.


अंजना ठमके आणि तिच्या संघातील अन्य तिघी धावपटूंनी अत्यंत चांगल्या सांघिक खेळाचे प्रदर्शन घडवित सुवर्णपदकावर नाव कोरले. या लढतीत भारतीय संघाबरोबरच श्रीलंका आणि थायलंडचे संघ अखेरच्या टप्प्यापर्यंत बरोबरीत धावत होते. मात्र, अखेरच्या क्षणी अंजनाने तिचा वेग प्रचंड वाढवत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय संघाने हे अंतर 3 मिनिटे 53. 88 सेकंदात गाठले. यात श्रीलंकेने (3:55:72से.) दुसरा आणि थायलंडने (3:58:56से.) तिसरा क्रमांक पटकावला.


भारताचे पदक विजेते
सुवर्ण : अंजना ठमके (800 मी.), मोहम्मद बशीर (800, 1500 मी.), अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी), शक्ती सोळंकी ( गोळाफेक), चित्रा पी. उन्नीकृष्णन (1500, 3000 मी.), आर्या सुदकरण (100 मी. अडथळा शर्यत), जिशा वलायुदन (400 मी. अडथळा शर्यत), सपना बर्मन (उंच उडी), मेघना बालकृष्णन (गोळाफेक), अंजना ठमके, चित्रा उन्नीकृष्णन, बबिता बालकृष्णन, जिशा (4 बाय 100 मी. रिले.).
रौप्य : राहुल सिंग (800, 1500 मी.), विक्रमजित सिंग (लांब उडी), शक्ती सोळंकी (थाळीफेक), रुमा सरकार (100, 200 मी.), संजीवनी जाधव (1500, 3000 मी.), मारिया (तिहेरी उडी), मारिया जैसन (बांबू उडी), सपना बर्मन (भाला फेक).
कांस्य : बबीत बालकृष्णन (800 मी.), अंकिता गोसावी (100 मी. अडथळा शर्यत), बिन्सी गोपालयन (5000 मी.), जेनिमोल जॉय (लांब उडी), पुष्पा रणबीर (भालाफेक), सपना बर्मन (हातोडा फेक).