आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajay Maken Says Suresh Kalmadi Should Not Go To Olympics ‎

भारतीय चमूतून सुरेश कलमाडी कटाप !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणातील आरोप सुरेख कलमाडीला ऑलिम्पिकसाठी लंडन दौर्‍यावर जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मात्र येथे रवाना होणार्‍या भारतीय संघातून कलमाडीला कटाप करण्यात आल्याची माहिती केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी दिली. कलमाडीला सीबीआय न्यायालयाने 10 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे त्याचा लंडन दौर्‍यावर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र क्रीडाविश्वात कलमाडीवर जोरदार टीका केली जात आहे.
विशेष न्यायाधीश तलवंत सिंह यांनी या प्रकरणाची सुनावणी केली. ते म्हणाले की, कलमाडी हे इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अथलेटिक कौन्सिलचे सदस्य आहेत. तसेच आशियाई अँथलेटिक संघटनेचे अध्यक्षदेखील आहेत. तसेच घोटाळा प्रकरणावर न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. याचा निकाल लागण्यास बराच अवधी आहे. त्यामुळे कलमाडीला जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय फेडरेशनसोबत चर्चा करणार - सुरेश कलमाडीला ऑलिम्पिक स्पर्धेचे निमंत्रण देणार्‍या आंतरराष्ट्रीय अँथलेटिक फेडरेशन व आयओसीसोबत चर्चा करणार आहे. तसेच या प्रकरणाची चौकशीदेखील करणार आहे. वेळ आलीच तर आम्ही त्या संघटनांसोबत बैठक आयोजित करणार आहोत. आम्ही त्यांना सर्व काही सत्य परिस्थिती समजवून सांगू, असेही माकन यांनी सांगितले.
आयओएचे हात वर - भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) या प्रकरणी हात वर केले आहेत. काळजीवाहू अध्यक्ष विजय मल्होत्रा यांनी कलमाडी प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने सुरेश कलमाडीला जाण्यासाठी रितसर परवानगी दिली आहे. त्यामुळे याविरोधात आम्ही काहीही बोलू शकत नाही. या वेळी ऑलिम्पिकमध्ये आयओएचा अध्यक्ष म्हणून कलमाडी जात नसल्याचे खरे आहे, असे मल्होत्रा म्हणाले.
आरोपीला परवानगी मिळणे दुर्दैवाचे! - क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत आरोपी व भ्रष्टाचारी व्यक्तीने सहभागी होऊ नये. त्यामुळे तेथील वातावरण गंभीर होऊ शकते. जेव्हा क्रीडा व्यवस्थेतील व्यक्तीवर असे आरोप असतात, तेव्हा त्यानेदेखील अशा मोठय़ा स्पर्धेत सहभागी होणे चुकीचे आहे. कलमाडीच्या बाबतीत असे घडणे दुर्दैवी आहे. मात्र भारतीय चमूतून त्याला कटाप केले आहे, असे माकन म्हणाले.