आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रींना दीर्घकालीन जबाबदारी द्यावी - अयाज मेमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रवी शास्त्रीयांनी आगामी विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय संघाच्या डायरेक्टरपदी राहावे, असे बीसीसीआयला वाटते. कर्णधार धोनी आणि संघाचे इतर सदस्यही जाहीरपणे शास्त्री यांची स्तुती करत आहेत. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शास्त्री यांचा मंत्र कामी आल्याचे खेळाडू सांगतात. सर्वच खेळाडू शास्त्री यांचे कौतुक करत असतील तर त्यांना डायरेक्टरपदी कायम ठेवण्यास बीसीसीआयला आडकाठी का? शास्त्री इंग्लंडविरुद्ध जबाबदारी पेलत असतानाच त्यांची मानसिकता सकारात्मक असून ते आपली जबाबदारी चोख पार पाडतील असे मी म्हटले होते. आज मी असे म्हणेन की जबाबदारी द्यायचीच असेल तर ती दीर्घकालीन द्या. नुसती विश्वचषकापर्यंतच नको. माझा हा विचार अनेकांना पटणार नाही. त्यामुळे माझी भूमिका मला मांडावीच लागेल. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत आपला धुरळा उडाला. संघाचा आत्मविश्वासही कमी झाला होता. पराभवाच्या गर्तेतून सावरण्यासाठी संघाला संकटमोचक हवा, अशी मागणी झाली. बीसीसीआयने थोड्या काळाकरिता ही व्यवस्था केली आणि रवी शास्त्री यांना डायरेक्टर बनवले. त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. मात्र संघाची कामगिरी यशाच्या मार्गावर खरोखर परतली आहे का, हा प्रश्न आहे. येत्या काही दिवसांत याचे उत्तर मिळेलच.
माझे असे मत आहे की, रवी शास्त्री यांची योग्यता आणि क्षमता पाहता त्यांना आगामी विश्वचषकापर्यंतच नव्हे, तर तीन वर्षांसाठी डायरेक्टर नेमावे. प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांना शाबासकी देऊन आणि कर्णधार धोनीला निर्विवाद बॉस उल्लेखून शास्त्री यांनी योग्य संभावना केली आहे. शास्त्री कौतुक करत असले तरी फ्लेचर गोंधळताच असतील. शास्त्री डायरेक्टरपदी कायम रािहले तर प्रशिक्षकाची भूमिका काय, हा प्रश्न त्यांना पडणे साहजिकच आहे.
एक खेळाडू तसेच कर्णधाराच्या रूपात मी शास्त्री यांना जोखले आहे. त्यांचा वकूब मी जाणून आहे. मात्र, आगामी िदवसांत त्यांची नेमकी काय भूमिका असेल हे अजूनही अस्पष्ट आहे. आता रािहला प्रश्न क्रिकेट डायरेक्टरपदाचा. हे एक शक्तिशाली पद आहे. संघातील सर्व खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफला डायरेक्टरकडे अहवाल द्यावा लागतो. भारतानंतर इतर देशांतही क्रिकेट डायरेक्टरची मागणी जोर धरत आहे. या महत्त्वपूर्ण पदाचा उपयोग अवघ्या सहा महिन्यांसाठीच होऊ शकत नाही. डायरेक्टरचा कार्यकाळ दीर्घकालीन असला पािहजे. त्यामुळेच शास्त्री यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असावा, असे मी म्हटले आहे. रवी शास्त्री प्रसार माध्यमांसमोरही व्यवस्थित फलंदाजी करत आहेत. समालोचन आणि समीक्षकाच्या या पारखी नजरेचा भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी उपयोग करून घेणे, हे आता बीसीसीआयच्या हाती आहे. शास्त्रींना टीम इंडियाच्या डायरेक्टरपदी कायम नेमले तर फ्लेचर आणि इतर स्टाफची भूमिका काय असेल हेही स्पष्ट करावे लागेल.