आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ब्लॅक बेल्ट' अजिंक्यला कराटेची चपळाई उपयोगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईचा कसोटीपटू अजिंक्य रहाणे खरं तर त्याच्या झुंजार फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आज श्रीलंकेत गाले येथे सुरू असलेल्या कसोटीत त्याने ८ झेल पकडून नवा विश्वविक्रम केला आणि सर्वांच्याच भुवया आश्चर्याने उंचावल्या. अजिंक्यला जवळून पाहणाऱ्यांना मात्र त्याच्या या कर्तृत्वाबाबत आश्चर्य वाटले नाही. अजिंक्यचे वैयक्तिक प्रशिक्षक प्रवीण अामरे म्हणत होते, गेली पाच-सहा वर्षे मी अजिंक्यकडून क्षेत्ररक्षणातील प्रत्येक जागेवरचा "स्पेशलाइज्ड' सराव करून घेतोय.

फलंदाजीचा सराव संपला की अजिंक्यला मी बसू देत नाही. आऊट फील्डला तो उत्तम क्षेत्ररक्षक आहेच. तरीही मी त्याच्याकडून गली, स्लीप, फॉरवर्ड शॉर्टलेग, शॉर्ट कव्हर्स, शॉर्ट मिडऑन अशा वेगवेगळ्या जागांवरचा क्षेत्ररक्षणाचा व प्रामुख्याने तेथे झेल टिपण्याचा सराव करून घेतो. अामरे म्हणत होते, अजिंक्य क्षेत्ररक्षणात कुठेही फिट बसतो. अगदी स्लीपमध्येसुद्धा. कारण त्याच्याकडे अभूतपूर्व चपळाई आहे. त्या चपळाईचे रहस्य आहे, तो कराटेचा ब्लॅक बेल्ट आहे. तेथे काेअर एक्झरसाइजमुळे काटक व चपळ बनला आहे.

सुरुवातीला तो स्लीपमध्ये झेल सोडायचा. मी त्याला म्हटले, मैदानातील कोणत्याही जागेवरचा स्पेशालिस्ट क्षेत्ररक्षक म्हणून तुला ओळखले गेले पाहिजे. ती गोष्ट त्याने खूपच मनावर घेतली. फलंदाजीचा सराव संपला की तो बसत नाही. वेगवेगळ्या जागांवर त्याला झेल टिपण्याचा सराव मी देत असतो. प्रत्येक जागेवर झेल टिपताना "बॉबी कॅचिंग' तत्त्व लावतो.