आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajinkya Rahane Possible To Play First Test Of Carrier In New Delhi

फिरोजशाह कोटलावर मिळू शकते अजिंक्‍य रहाणेला संधी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- वेस्‍ट इंडीजचा संघ नोव्‍हेंबर 2011 मध्‍ये जेव्‍हा टीम इंडियाच्‍या दौ-यावर आला होता. त्‍यावेळी निवडसमितीने देशांतर्गत क्रिकेटमधील अजिंक्‍य रहाणेचा फॉर्म पाहून त्‍याची संघात निवड केली होती. तेव्‍हापासून टीम इंडियाने 16 कसोटी सामने खेळले आहेत. मात्र, एकदाही त्‍याला अंतिम 11 मध्‍ये स्‍थान मिळू शकलेले नाही. त्‍याची ही दीर्घकालीन प्रतिक्षा शुक्रवारी संपू शकते. चौथ्‍या आणि शेवटच्‍या कसोटीत त्‍याला टीममध्‍ये संधी मिळण्‍याची शक्‍यता आहे.

टीम इंडियाने मात्र अजूनही आपले सगळे पत्ते उघडलेले नाहीत. वीरेंद्र सेहवागऐवजी संघात स्‍थान मिळालेल्‍या शिखर धवनने तिस-या कसोटीत जबरदस्‍त पर्दापण केले होते. मात्र, त्‍याच कसोटीत तो जखमी झाल्‍यामुळे चौथ्‍या कसोटीत तो खेळू शकणार नाही. त्‍याच्‍याऐवजी सुरेश रैनाचा समावेश करण्‍यात आला आहे. मात्र, सलामीवीरासाठी धवन बरोबर रहाणेलाही निवडण्‍यात आले होते. त्‍याला कदाचित उद्या संधी मिळू शकते. त्‍याने 60 प्रथमश्रेणी सामन्‍यात 62.04 च्‍या सरासरीने 5460 धावा केल्‍या आहेत. यामध्‍ये दोन शतकांचाही समावेश आहे. त्‍याच्‍या या कामगिरीचा संघ निवडीवेळी विचार होऊ शकतो.