आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajit Chandila News In Marathi, IPL Season 6, BCCI

अजित चंडिलाला लेखी उत्तर देण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गतवर्षीच्या आयपीएलमध्ये निकालनिश्चितीच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजित चंडिला आज बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीपुढे हजर झाला. एन. श्रीनिवासन, राजीव शुक्ला व शिवलाल यादव या त्रिसदस्यीय समितीने राजस्थान रॉयल्सच्या अजित चंडिलाला त्याच्याविरुद्धच्या आरोपांना उत्तरे देण्यास सांगितले होते. बुधवारच्या बैठकीत चंडिलाने आपल्याविरुद्धच्या आरोपांना उत्तरे दिल्याचे कळते.

चंडिलाने आपल्याविरुद्धचे सारे आरोप आजच्या बैठकीत फेटाळून लावल्याचे कळते. मात्र शिस्तपालन समितीने त्याला त्याचा जबाब लेखी स्वरूपात देण्यास सांगितले. त्यावर चंडिलाने लेखी उत्तर देण्यास काही काळ लागेल, असे सांगितले. चंडिलाने समितीकडे आणखी अवधी मागितला. समितीने त्यावर त्याला 12 मार्चपर्यंत अंतिम जबाब देण्याची मुभा दिली.