आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhil's Half Centurey; Indian Youth Team Hattric Victory

अखिलचे अर्धशतक; भारतीय युवा संघाची विजयी हॅट्ट्रिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - जालन्याचा गुणवंत खेळाडू विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा संघाने 19 वर्षांखालील चौरंगी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी विजयाची हॅट्ट्रिक केली. भारताने सामन्यात ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 18 धावांनी पराभूत केले.


श्रेयस अय्यरच्या (109) शतकाच्या बळावर भारताने सामन्यात विजय मिळवला. कर्णधार विजय झोलने 38 धावांचे योगदान दिले. भारताने दिलेल्या 321 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणा-या ऑस्ट्रेलियाला सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे 30 षटकांत 175 धावांचे आव्हान देण्यात आले होते. निर्धारित षटकांत ऑस्ट्रेलिया 156 धावाच करू शकला. भारतीय संघाचे 3 सामन्यात आता 12 गुण झाले आहेत.


प्रथम फलंदाजी करताना भारताकडून अंकुश बिन्स (20) व अखिल हेरवाडकरने (56) 46 धावांची भागीदारी केली. अखिलने 65 चेंडंूत अर्धशतक ठोकले. कर्णधार विजय झोलने 56 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार लगावत 38 धावांचे योगदान दिले. श्रेयस अय्यर (109) आणि रिकी भुई (66) या जोडीने 170 धावांची भागीदारी केली. अय्यरने आक्रमक फटकेबाजी करत अवघ्या 67 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकार खेचत शतक ठोकले.