आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानलाही होता \'युवी\'चा धसका, 160 कोटीची हवी होती बोली - शोएब अख्‍तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'युवराजसिंगवर 16 कोटी नाही तर 160 कोटीची बोली लागायला हवी होती. युवी अद्वितीय खेळाडू असून त्‍याला पाकिस्‍तान संघसुध्‍दा घाबरतो. युवराज लवकरच पुनरागमन करुन धावांचा पाऊस पाडेल' असे उद्गार पाकिस्‍तानची 'रावळपिंडी एक्‍सप्रेस' नावाने प्रसिध्‍द असलेला शोएब अख्‍तरने काढले. अख्‍तरने एका वृत्‍तवाहिनीला मुलाखत देताना वरील उद्गार काढले आहेत.
धोनी आणि युवराज दोघेही दिग्‍गज खेळाडू आहेत. भारतासाठी अत्‍यंत मौलिक कामगिरी ते करु शकतात. दोघांमध्‍ये काही मतभेद असतील तर त्‍यांनी एकत्र येऊन सोडवले पाहिजेत. असा सल्‍लाही त्‍याने दिला.
दक्षिण आफ्रिकेविषयी मत -
विश्‍वचषकात येत्‍या 22 फेब्रुवारी रोजी भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविषयी असणार आहे. तेव्‍हा भारताने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली पाहिजे. कारण भारताकडे तगडे फलंदाज आहेत. कोहली, अजिंक्य रहाणे, धोनी सारख्‍या खेळाडूंच्‍या जबरदस्‍त फलंदाजीच्‍या जोरावर भारत सामना जिंकू शकतो. भारतीय गोलंदाजांनीही बाऊंसरचा मारा केला पाहिजे.
एबी डिविलियर्सला कसे बाद करण्‍याविषयी
डिविलियर्सला सुरुवातीलच चार-पाच षटकातच बाद केले पाहिजे. नाहीतर तो गोलंदाजासाठी कर्दनकाळ ठरु शकतो. डिविलियर्सवर बाउंसरचा मारा केला पाहिजे असेही तो म्‍हणाला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, युवराजच्‍या वडिलांनी दिली धोनीला शिवी..