आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचा अक्षर पटेल ‘टीम इंडिया’मध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुजरातचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याचा वेस्ट इंडिजविरुद्ध उर्वरित २ एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. धरमशाला येथे १७ ऑक्टोबरला चौथा वनडे, तर पाचवा सामना २० ऑक्टोबरला कोलकाता येथे होईल. कसोटी मालिकेआधी विंडीजविरुद्ध कानपूर येथे होणा-या ३ दिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड प्रेसिडेंट संघाचे नेतृत्व कसोटी संघाबाहेर फेकल्या गेलेल्या सुरेश रैनाकडे सोपविण्यात आले आहे. कटक येथील ट्वेन्टी-२० सामन्यासाठीही अक्षर पटेलला भारतीय संघात स्थान देण्यात आले असून, मनीष पांडेलाही संधी देण्यात आली आहे. कानपूर येथील सामना २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान होईल तर ट्वेन्टी-२० सामना कटक येथे २२ ऑक्टोबरला होणार आहे.

भारतीय वनडे संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, महंमद शामी, ईशांत शर्मा, उमेश यादव, मुरली विजय, कुलदीप यादव, अक्षर पटेल.

ट्वेन्टी-२० संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, सुरेश रैना, स्ट्युअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, करण शर्मा, भुवनेश्वर, महंमद शामी, संजू सॅम्सन, मनीष पांडे, उमेश यादव.

बोर्ड प्रेसिडेंट संघ
सुरेश रैना (कर्णधार), जीवन ज्योत सिंग, के. एल. राहुल, नमन ओझा, रोहित शर्मा, मनोज तिवारी, वृद्धिमान साहा, करुण नायर, परवेझ रसूल, पंकज सिंग, ईश्वर पांडे, जसप्रीत भुमरा, करण शर्मा, कुलदीप यादव.