आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alastair Cook Does Not Resign Captaincy Of England, Lastest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्‍वचषकामध्‍ये माझ्या अनुभवाचा देशाला फायदा होईल, कर्णधार कूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिगहॅम - भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्‍ये टीकेचा धनी ठरलेला इंग्‍लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने नेतृत्व सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
काय म्‍हणाला कूक
‘मागील साडेतीन वर्षांपासून संघाची धुरा सांभाळत असून माझ्या अनुभवाचा फायदा संघांला विश्वचषक जिंकण्यासाठी होऊ शकतो' असे त्‍याने टीकाकारांना उत्‍तर दिले आहे. तो पुढे म्‍हणाला की, 'एकदिवसीय मालिकेत आमची कामगिरी निराशाजनक झाली असली तरी पुढील सामन्यात चांगली कामगिरी करू शकतो.

अशी केली पराभवाची कारण मिमांसा
सलामीच्‍या फलंदाजांनी लवकर विकेट टाकल्‍याने आम्‍हाला पराभव पत्‍करावाला लागला. अशी कारणमीमांसा त्याने केली. क्रिकेटमध्ये एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर असताना खेळताना दबाव येतो. खेळाडूंना नैसर्गिक खेळ करणे कठीण जाते, अशी कबुलीही कूकने दिली.